Advertisement

मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणारे एका 'विशिष्ठ' पक्षाचे कार्यकर्ते

प्रजापत्र | Sunday, 02/03/2025
बातमी शेअर करा

मुंबई : मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीची छेडछाड करणारे टवाळखोर हे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis)  यांनी दिली आहे. तर या छेडछाड प्रकरणी काही जण अटकेत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दुर्दैवाने या संपूर्ण प्रकरणात काही विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी असून त्यांनी हे अतिशय वाईट अशा प्रकरचे काम केलंय. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून  काहींना अटक केली आहे. तर इतरांनाही अटक केली जाईल. पण अशाप्रकारे छेडखानी करणं, सार्वजनिक ठिकाणी महिलांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis)  यांनी दिली. 

Advertisement

Advertisement