Advertisement

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत छेडछाड

प्रजापत्र | Sunday, 02/03/2025
बातमी शेअर करा

जळगाव:  केंद्रीय राज्यमंत्री (Raksha khadse)रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत काही टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. मुक्ताईनगरमधील यात्रेत ही घटना घडल्याची माहिती आहे. याप्रकरणी रक्ष खडसे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आता संतप्त प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon) मुक्ताईनगर येथे यात्रा सुरू आहे. या यात्रेत रक्षा खडसे (Raksha khadse)यांची मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत गेली होती. या यात्रेत काही टवाळखोर आले होते. त्यांनी भर यात्रेत रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणींची छेड काढली.दरम्यान, (Crime news)यावेळी सुरक्षारक्षकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या टवाळखोरांनी सुरक्षारक्षकांना न जुमानता मुलींना धक्काबुक्की केली. याप्रकरणी रक्षा खडसे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. या आरोपींचा त्यांचा शोध घेतला जातो आहे.

Advertisement

Advertisement