Advertisement

शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार

प्रजापत्र | Wednesday, 26/02/2025
बातमी शेअर करा

पुणे-  शिवशाही (Pune)बसमध्ये तरुणीवर अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्दळीच्या स्वारगेट एसटी (St bus)स्थानकावर पहाटे साडेपाच वाजता ही धक्कादायक घटना घडली. (Pune police)पोलिस आरोपीच्या मागावर आहेत. पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेटला आली होती. दत्तात्रय रामदास गाडे नावाच्या तरुणाने तिला फसवून अंधारात उभ्या असलेल्या शिवशाही (pune crime)बसमध्ये बसवले यानंतर बसचा दरवाजा लावून तिच्यावर अत्याचार केला.

आरोपीवर याआधीही गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. पोलीसांनी आरोपीचा शोध सुरु केला. गजबजलेल्या स्वारगेट स्थानकावर असा धक्कादायक प्रकार समोर आल्याने महिला सुरक्षेबाबत प्रश्नचिह्न निर्माण झाले आहे.

Advertisement

Advertisement