Advertisement

दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी आले 'हे' नाव समोर

प्रजापत्र | Wednesday, 27/01/2021
बातमी शेअर करा

देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना, काल(मंगळवार) राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान उफाळलेल्या हिंसाचार पाहून सर्वजण थक्क झाले. या हिंसाचाराता सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान तर झालंच शिवाय तब्बल ३०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी  देखील जखमी झाले आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. या हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत २२ गुन्हे नोंदवण्यात आले असून, पोलिसांकडून हिंसाचारास कारणीभूत असलेल्यांचा शोध सुरू आहे. या दरम्यान दीप सिद्धू याच्याबरोबरच गँगस्टर लक्खा सिंह सिधाना याचं नाव देखील समोर आलं आहे.
लक्खा सिधाना व त्याच्या सहकाऱ्यांची सेंट्रल दिल्लीमध्ये घडलेल्या हिंसाचारात महत्वाची भूमिका असल्याचे समोर आले आहे. आता दिल्ली पोलीस या दिशेने अधिक तपास करत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दिल्ली पोलीस त्याच्या विरोधातील पुरावे गोळा करत आहेत.  आंदोलनातील तरूणांना हिंसाचारासाठी भडकवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.