Advertisement

 राज्याचे वाळू धोरण २४ फेब्रुवारीला जाहीर होणार : चंद्रशेखर बावनकुळे

प्रजापत्र | Sunday, 23/02/2025
बातमी शेअर करा

 यवतमाळ: राज्याचे वाळू धोरण (Sand Policy) (दि.२४) फेब्रुवारीला जाहीर होणार आहे, अशी माहिती (Chandrashekhar Bawankule)महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. शनिवारी (दि.२२) रोजी एका कार्यक्रमासाठी उमरखेड येथे आले असता ते बोलत होते.

राज्य शासनाने वाळू संदर्भात अद्यापही कोणतेही धोरण जाहीर केले नसल्याने वाळूची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू आहे. यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे. यासंदर्भात उमरखेड येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांना विचारणा केली असता त्यांनी शासनाचे वाळू धोरण (दि.२४) फेब्रुवारी रोजी जाहीर होणार असल्याचे सांगितले. (दि.२६) फेब्रुवारीपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचीही माहिती त्‍यांनी दिली.

केंद्र व राज्य शासन योजनेच्या माध्यमातून घरकुल योजना राबवीत शनिवारी २० लाख घरकुल धारकांना पहिला हप्ता केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे हस्ते पुणे येथील कार्यक्रमात ऑनलाईन वितरित करण्यात आला. उमरखेड येथे या वेळी १४०० घरकुलांचा पहिला हप्ता ऑनलाईन वाटपाला बाबनकुळे यांच्या उपस्‍थितीत करण्यात आली.

Advertisement

Advertisement