मुंबई- काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर(Ravindra Dhangekar)यांचं एक व्हॉट्सअॅप स्टेट्स सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. रवींद्र धंगेकर यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेट्समधील फोटोत त्यांनी गळ्यात भगवं उपरणं परिधान केल्याचं पाहायला मिळालं. त्यांचं हे स्टेट्स चांगलंच व्हायरलं झालं. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या मनात नेमकं काय चाललंय? याबाबत अनेकांनी सवाल उपस्थित केले. मात्र, आता यावर शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री उदय सामंत (Uday Samant)यांनी आज (२३ फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना एक मोठं विधान करत रवींद्र धंगेकर यांना थेट पक्षात येण्याची ऑफर दिल्याचं सांगितलं. “मी कालच रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)यांना पक्षात येण्याचं निमंत्रण दिलं आहे”, असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
बातमी शेअर करा