Advertisement

 ...तर मातोश्रीवर मर्सिडीजची रांग असती

प्रजापत्र | Sunday, 23/02/2025
बातमी शेअर करा

मुंबई :उद्धव ठाकरे गटाचे लोकही फार समोर नाहीत त्यामुळे ते (Shivsena UBT)असताना मला बोललेले फार आवडले असते. नेत्यांना संपर्कच नको असेल तर आपण तिथे नकोसे झालो हे समजावे. २ मर्सिडिज गाड्या मिळाल्यावर एक पद असे होते. (Balasaheb Thackeray)बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचे सगळीकडे लक्ष होते, मात्र त्यानंतर त्यात खूप बदल होत गेले. २०१९ ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हालाही खूप धन्य वाटले. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे कारण होते. मात्र आमदारांना भेटी मिळणार नाहीत. कुठल्याही विषयावर भेट नाही. या सर्व गोष्टीचा विचार केला स्थित्यंतरे होण्यामागे बरीच कारणे असतात. त्यावर वेगळी चर्चा करायला जरूर माझी तयारी आहे, असे  (Shivsena shide)शिवसेना शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे  (Neelam Gorhe)यांनी म्हटले आहे. यावरून आता नवा वाद निर्माण होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

 

 

दिल्लीत साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe)यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राजकीय प्रश्नांवर भाष्य करताना केलेल्या विधानावरून ठाकरे गटातील नेते नीलम गोऱ्हे यांच्यावर पलटवार करत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते (Ambadas Danve)अंबादास दानवे यांनीही यावरून टीका केली आहे. चार टर्म ज्यांना फक्त फॉर्म भरावा लागला आणि पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्यांनी असा आरोप करणे दुर्दैवी आहे. असा आरोप करणे ही नमक हरामी आहे, असा पलटवार दानवे यांनी केला. 

 

Advertisement

Advertisement