Advertisement

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या गाड्या रद्द

प्रजापत्र | Sunday, 23/02/2025
बातमी शेअर करा

मुंबई : काल रात्री कर्नाटक (Karnataka)राज्यातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (Maharashtra State Road Transport Corporation)चालकांना कर्तव्यावर असताना काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळे फासले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याचा आम्ही निषेध करतो. प्रवासी आणि आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन पुढील अनिश्चित काळासाठी कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी (St bus)बसेस रद्द करण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी) विवेक भीमनवार यांना दिले आहेत.

Advertisement

Advertisement