Advertisement

घरफोडी करून साडेचार लाखांचे दागिने,रोख रक्कम केली लंपास 

प्रजापत्र | Sunday, 09/02/2025
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.९ (प्रतिनिधी)- (Ambajogai)शहरातील विमलसृष्टी परिसरात एका घरात अज्ञात(crime) चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे साडेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गणपती सुरेशराव बुरगे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

गणपती सुरेशराव बुरगे (वय ३०) हे आपल्या पत्नी शिल्पासह विमलसृष्टी येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे (Ambajogai) अंबाजोगाई शहरात सॅमसंग मोबाईल विक्रीचा व्यवसाय आहे. दि. ३ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता ते महमदापुर येथे गेल्यानंतर घरी कोणी नसल्याने घराला कुलूप लावून गेले होते. त्यांची पत्नी शिल्पा बुरगे ही परीक्षा देण्यासाठी पुण्याला गेली होती. (दि.७ फेब्रुवारी ) रोजी रात्री आठ वाजता घरी परतल्यावर त्यांना घराचा कोंडा तुटलेला दिसला. दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी मागील दरवाज्यातून प्रवेश केला असता, घरातील कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. वरच्या मजल्यावरील बेडरूममधील कपाटातील लॉकर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. चोरीला गेलेल्या वस्तूंचे अंदाजे मूल्य ४ लाख ५० हजार रुपये असून त्यामध्ये पाच तोळे सोन्याच्या बांगड्या, पाच तोळे सोन्याची साखळी, ५ ग्राम सोन्याची अंगठी आणि रोख ३० हजार रुपये असल्याचे गणपती बुरगे यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. चोरट्यांनी ३ ते ७ फेब्रुवारी दरम्यान घर फोडून चोरी केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.(Ambajogai poice) अंबाजोगाई शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement