Advertisement

बाल पुरस्कारातही महाराष्ट्राचा डंका, ३२ पैकी ५ पुरस्कार महाराष्ट्राला

प्रजापत्र | Monday, 25/01/2021
बातमी शेअर करा

डी. डी. बनसोडे/केज

दिल्ली दि.25 -  देशातील 32 बालकांना रविवारी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2021 प्रदान करण्यात आले. केंद्र सरकार नवनिर्माण, शैक्षणिक यश, क्रीडा, कला आणि संस्कृती ,समाज सेवा, आणि शौर्य या क्षेत्रात अपवादात्मक क्षमता आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना हे पुरस्कार प्रदान करते. विशेष म्हणजे महाराष्ट्राला यंदा सर्वाधिक पाच पुरस्कार मिळाले आहेत.

                  पुरस्कारार्थी बालकांत 21 राज्ये,केंद्रशासित प्रदेशातील 32 जिल्ह्यांतील मुलांचा समावेश आहे. 7 पुरस्कार कला आणि संस्कृती क्षेत्रातील बालकांना, 9 पुरस्कार नवनिर्मिती क्षेत्रातील बालकांना, 5 बालकांना शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी बद्दल पुरस्कार देण्यात आले आहेत. 7 बालकांना क्रीडा क्षेत्रात,3 बालकांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून एका बालकाला त्याच्या समाजसेवेच्या क्षेत्रातील प्रयत्नांसाठी सन्मानित करण्यात आले आहे.

     दरम्यान कामेश्वर जगन्नाथ वाघमारे (शौर्य पुरस्कार), श्रीनाभ मौजेश अग्रवाल (नवनिर्माण पुरस्कार),अर्चित राहुल पाटील (नवनिर्माण पुरस्कार) सोनीत सीसोलेकर (शैक्षणिक पुरस्कार),काम्या कार्तिकेयन (क्रीडा पुरस्कार) या महाराष्ट्रातील बालकांनी बाजी मारली आहे.

Advertisement

Advertisement