पाथर्डी : मागच्या दोन महिन्यांपासून आरोपांच्या वादळात अडकलेल्या मंत्री धनंजय मुंडेंसाठी आता भगवानगड( Bhagwangad ) धावून आला आहे. मंत्री धनंजय मुंडेंनी गुरुवारी भगवानगडावर मुक्काम केल्यानंतर शुक्रवारी भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेवशास्त्री यांनी भगवानगडाची भूमिका स्पष्ट केली असून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) खंडणीवर जगणारे नेते नाहीत, भगवानगड त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे असे म्हटले आहे.
मागच्या दोन महिन्यापासून मंत्री धनंजय मुंडे यांच्याभोवती आरोपांचे वादळ असून त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आणि स्वकीय दबाव वाढवित आहेत. या पार्श्वभूमीवर काल धनंजय मुंडे भगवानगडावर मुक्कामी होते. त्यांनी भगवानबाबा, भीमसिंह महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन महंत नामदेवशास्त्री यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी माध्यमांशी संवाद साधला.
संतोष देशमुख हत्या प्रकरण गंभीर आहे, पण त्यात ( Namdevshastri on Dhananjay Munde) धनंजय मुंडेंचा काय दोष? ते खंडणीवर जगणारे नेते नाहीत. ते गुन्हेगार नाहीत. एखाद्या संवेदनशील प्रकरणाच्या आडून राजकारण करणे हा भित्रेपणा आहे याचे सर्वांनी भान ठेवावे असे सांगतानाच महंत नामदेवशास्त्री यांनी भगवानगड भक्कमपणे धनंजय मुंडे यांच्या पाठिशी असल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच अशा राजकारणातून सामाजिक सलोखा बिघडत असल्याचेही शास्त्री म्हणाले.
धनंजय मुंडेंवर होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आता भगवानगडाने ही जाहीर भूमिका घेतल्याने धनंजय मुंडेंना बळ मिळणार आहे.
प्रजापत्र | Friday, 31/01/2025
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा