Advertisement

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आज भगवानगडावर (Bhagwangad) करणार मुक्काम

प्रजापत्र | Thursday, 30/01/2025
बातमी शेअर करा

बीड : मागच्या काही दिवसांपासून सातत्याने वेगवेगळ्या आरोपांचा सामना करीत असलेले राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आज भगवानगडावर मुक्काम करणार आहेत. राज्याच्या समाजकारणात भगवानगडाचे एक वेगळे महत्व आहे. 

 

बीड जिल्हयाच्या राजकारण समाजकारणात नारायणगड, भगवानगड यांचा मोठा प्रभाव राहिलेला आहे. त्यातही धनंजय मुंडे यांच्या राजकीय जिवनात भगवानगडाचे मोठे महत्व राहिलेले आहे.  काही काळासाठी भगवानगडाला धनंजय मुंडे पारखे झाले होते, नंतर मात्र धनंजय मुंडे (Bhagwangad)भगवानगडाचे लाडके भक्त झाले होते. भगवानगडाच्या आशीर्वादानंतर (Dhananjay Munde)धनंजय मुंडेंचा राजकीय आलेख देखील उंचावला होता. 
मागच्या काही काळात धनंजय मुंडे वेगवेगळ्या आरोपांच्या वादळात घेरले गेले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपण अभिमन्यू नव्हे तर धनंजय आहोत असे विधान करत कोंडी फोडली होती. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे आज त्यांचे उर्जास्थान असलेल्या भगवानगडावर मुक्कामी जात आहेत. जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर मुंडे अहिल्यानगर जिल्हयात जात असून तेथून ते भगवानगडावर मुक्काम करतील. उद्या सकाळी ते भगवानगडावरुन परळीत परतणार असून दोन दिवस परळीत राहणार आहेत. (Dhananjay Munde)धनंजय मुंडे त्यांच्या राजकीय सामाजिक आयुष्यात प्रथमच (Bhagwangad)भगवानगडावर मुक्काम करित आहेत. तर कदाचित भगवानगडावर मुक्कामी थांबणारे देखील धनंजय मुंडे एकमेव मंत्री असतील.

Advertisement

Advertisement