केज दि.२१ (प्रतिनिधी)-तालुक्यातील साळेगाव येथे एसटी (Beed Accident) बस आणि ट्रकच्या झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना आज (दि. २१) दुपारी १ च्या सुमारास केज-कळंब महामार्गावरील साळेगाव नजीक घडली.
याबाबतची माहिती अशी की, ट्रक (एम एच-२६/बी ई-६३३५) हा केजच्या दिशेने जात होता. त्याच्या पाठीमागे (Beed Bus Accident)कळंब आगाराची एस टी बस (एम एच-४०/एन-९७२२) जात होती. यावेळी ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावल्याने बस ट्रकला पाठीमागून धडकली. या अपघातात बस मधील प्रवाशी विठ्ठल बाबुराव यादव (रा. हादगाव, ता. केज), चंद्रकला सुरेश पौळ (रा. बेलगाव, ता. केज), शंकर श्रीराम पोळ (रा. सारणी आं. ता. केज), प्रताप शंकर पांचाळ (रा. बनसारोळा, ता. केज), भिमराव लखमु भोसलेरा (रा. केज, ता. केज) आणि राजेंद्र विश्वनाथ गुंठाळ (रा. माळेगाव, ता. केज) हे जखमी (Kaij) झाले आहेत. जखमींना उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल केले. तर गंभीर जखमींना अंबाजोगाई येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. केंद्रे यांनी दिली आहे.
पोलीस निरीक्षक वैभव पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर, पोलीस नाईक महादेव बहिरवाळ, पोलीस नाईक शिवाजी कागदे यांनी अपघातस्थळी धाव घेतली.