केज दि.१८ (प्रतिनिधी)- तालुक्यातील ढाकेफळ येथे रात्री शेतातून पिकाला पाणी देऊन घरी निघालेल्या तरूणाची मोटारसायकल उसाच्या ट्रॉलीला धडकली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यु झाला. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली.
केज (kaij) तालुक्यातील ढाकेफळ येथील सुभाष रतन अंधारे (वय २५ वर्षे) तरूण याने शेतात पिकाला पाणी दिल्यानंतर दुचाकीवरून गावाकडे जात असताना रस्त्यावरच उभ्या केलेल्या एका ट्रॉलीला जोराची धडक दिली. यामध्ये रतन याचा जागीच मृत्यु झाला. या प्रकरणी युसूफवडगाव (police)पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातमी शेअर करा