बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan Attacked) याच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. यात त्याच्या मानेवर चाकूने वार करण्यात आले आहेत. सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समजते. दरम्यान, सैफच्या घरी (crime)क्राइम ब्रँचचे अधिकारी दाखल झाले आहेत. एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक आणि (police)पोलीस अधिकारी चौकशीसाठी पोहोचले आहेत.
मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास सैफ अली खानवर हल्ला झाल्याची माहिती समजते. (Saif Ali Khan Attacked) घरात चोर शिरल्याचं घरात असलेल्या मदतनीस महिलेनं पाहिलं. चोराने तिच्या हातावर वार केला आहे. चोराची नोकरांसोबत झटापटही झाली. त्यानंतर सैफ अली खान आणि चोर यांच्यात झटापट झाली. यावेळी चोराने सैफवर चाकूने वार केले. सैफच्या पाठीत चाकू खुपसला असल्याची माहिती समजते.
सैफ अली खानच्या घरात मध्यरात्री चोर घुसला. त्याला मोलकरणीने हटकवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चोर तैमूरच्या रूममध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. या हल्लात करिना कपूर, तैमूर, जेह हे सुखरुप असल्याचं सांगण्यात येतंय. (mumbai) मुंबई पोलिसांची सात पथके तपासासाठी तैनात करण्यात आली आहेत. एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक तपासासाठी सैफच्या घरी दाखल झाले आहेत.सैफच्या (Saif Ali Khan Attacked)घरातील नोकर आणि इतरांची चौकशी करण्यात येत आहे. चोर घरात कुठून घुसला, कसा घुसला? याची माहिती घेतली जात आहे. चोरी करण्याच्याच उद्देशाने आला होता का? की हल्ल्याचा कट होता? याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी सैफच्या घरातील नोकरांचे फोनही जप्त केले आहेत. अद्याप कुटुंबिय किंवा पोलीसांनी या घटनेबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.