Advertisement

दीड कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी गजाआड    

प्रजापत्र | Saturday, 23/01/2021
बातमी शेअर करा

बीड-परळी शहरातील माऊली मल्टीस्टेटमध्ये दीड कोटींचा घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आले होते.याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी फरार होते.याप्रकरणी शनिवारी (दि.२३) आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी मुख्य आरोपीला औरंगाबादमधून अटक केली.
                   परळी शहरातील माऊली मल्टीस्टेटमध्ये अडीच कोटींचा घोटाळा झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. तपासामध्ये दीड कोटींचा घोटाळा असल्याचे समोर आले. या प्रकरणी ओम नारायण जैस्वाल (वय-५० रा.परळी), संगीता ओम जैस्वाल व विष्णू भागवत या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मुख्य आरोपी ओम नारायण जैस्वाल यास औरंगाबाद येथील एमआयडीसी परिसरातून अटक करण्यात आली. तर विष्णू भागवत हा इतर गुन्ह्यात जेलमध्ये असून संगीता जैस्वाल ही अद्यापही फरारच आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्यासह आदींनी केली.

Advertisement

Advertisement