बीड दि.२५(प्रतिनिधी)- पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरून पो.नि. शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाने आज पहाटे पात्रुड गल्ली भागातील गावठी
हातभट्टी दारू अड्ड्यावर धाडी टाकल्या. या कारवाईत डीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी शेकडो लिटर रसायन उध्वस्त केले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बीड शहर ठाण्यातील डीबी पथकातील सपोनि राठोड, सहाय्यक फौजदार सिरसाट, पोहे तांबारे, पोशि सय्यद, मनोज परजणे हे आज सकाळी अवैध धंद्यांवरील कारवाईसाठी जात असतांना पात्रुड गल्ली भागातील पत्र्याच्या शेडमध्ये हातभट्टी दारूचा अड्डा असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पोनि बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ बाजण्याच्या सुमारास पात्रुड गल्ली भागात दोन ठिकाणी छापे टाकून सहा निळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या डूम मधील शंभर लिटरचे रसायन व दोन पत्र्याच्या डब्यामधील १८ लिटरचे रसायन उध्वस्त केले तर दुसऱ्या कारबाईत पाच लिटरचे दोन ड्रम व इतर साहित्य उध्दवस्त करण्यात आले. या दोन्ही कारवाईत हजारो रूपयांचा मुद्देमाल जप्न करण्यात आला असुन या प्रकरणी पो.ह. आजिनाथ सानप यांच्या फिर्यादीवरून राकेश प्रभाकर उर्फ गुडबा जाधव याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.