बीड-मस्साजोगच्या सरपंच हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मोठी घोषणा करताना पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. हत्या प्रकरणात पोलीस अधीक्षक यांच्या कार्यावर ठपका ठेवत फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली. त्यामुळे आता बीडला कोणता अधिकारी येतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यामुळे हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटत होते. मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना आज सभागृहात दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला. तसेच याप्रकरणातील दोषींवर मकोका लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर वाल्मिक कराड यांचा एका गुन्हयात सहभाग असून दुसऱ्या गुन्ह्यातील सहभाग आम्ही तपासणार असल्याचे आश्वासन त्यांनी सभागृहाला दिले. दरम्यान पोलीस अधीक्षक यांच्या हलगर्जीपणामुळे आता त्यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून बीडला कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बातमी शेअर करा