Advertisement

'मंत्रिपदाची शपथ घ्या'; चंद्रशेखर बावनकुळेंचा पंकजा मुंडेंना फोन

प्रजापत्र | Sunday, 15/12/2024
बातमी शेअर करा

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा आज (१५.डिसेंबर) नागपूरमध्ये विस्तार होणार आहे. १९९१ नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. आज दुपारी ४ वा.राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे २१, शिवसेनेचे १२, राष्ट्रवादीचे १० मंत्री असणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा आज नागपूर येथे शपथविधी सोहळा होणार असून या मंत्रिमंडळ विस्तारात भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे यांची वर्णी लागली आहे.

 

पक्षाच्या वतीने पंकजा मुंडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली असून मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी उपस्थित राहण्याचा संदेश त्यांना आलेला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन करून मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी उपस्थित राहण्याबाबत संदेश दिला आहे. सुरुवातीपासूनच पंकजा मुंडे यांची मंत्रीपदी वर्णी लागणार हे निश्चित होते. मात्र शेवटच्या क्षणापर्यंतही शपथविधीत कोण कोण मंत्री होणार याबाबत मोठा सस्पेन्स ठेवण्यात आला होता. आज सकाळी संबंधित सर्व मंत्र्यांना पक्षाच्या वतीने निरोप देण्यात आले असून आज दुपारी ४ वा. नागपूर येथील राजभवनात हा शपथविधी पार पडणार आहे. यापूर्वीच्या फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडे यांनी महिला व बालविकास, ग्रामविकास, जलसंधारण मंत्री म्हणून काम केले होते. बीडच्या पालकमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे.

Advertisement

Advertisement