Advertisement

मस्साजोगच्या सरपंच खून प्रकरणी वडवणी आज कडकडीत बंद

प्रजापत्र | Thursday, 12/12/2024
बातमी शेअर करा

वडवणी दि.१२(प्रतिनिधी):- मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला आहे. या घटनेला साधारण तीन ते चार दिवस झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज  (दि.१२) रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला आहे या बंदला देखील व्यापार्‍यांचा शंभर टक्के पाठिंबा देत आर्थिक व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे.

 

सविस्तर माहिती अशी कि, मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निघृनपणे खून करण्यात आला आहे. या घटनेन जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी व यातील संपुर्ण आरोपीचा शोध घेण्यात यावा, या प्रकरणातील मास्टरमांईंड कोण याचा देखील पोलीसानी तपास करावा. आरोपीवर कठोर शासन करुन फाशी देण्यात यावी या मागणीसाठी आज वडवणी तालुका मराठा सकल समाजाच्या वतीने शहर बंदाची हाक देण्यात आली आहे. याला व्यापाऱ्यानी देखील शंभर टक्के प्रतिसाद देत आर्थिक व्यवहार बंद ठेवत पाठींबा दर्शविला.तर या मागणीचे  वडवणी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement