नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरण मोहिमेला १६ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आलीय. परंतु, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेते या लसीकरण मोहिमेत का सहभागी झाले नाहीत? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात होता. या निमित्तानं कोरोना लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीही लसीकरणात सहभागी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय.
कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींचं लसीकरण करण्यात येणार आहे. याच टप्प्यात सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदार ज्यांचं वय ५० वर्षांहून अधिक आहे अशांना कोरोना लस देण्यात येणार आहे.असं असलं तरी करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला नेमकी कधी सुरुवात होणार, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
बातमी शेअर करा