देशात यूपीआय (upi payment)पेमेंटचे प्रमाण वेगाने वाढले आहे. लहानमोठी पेमेंटही मोबाइलने (mobile)करणे शक्य झाल्याने लोकांनी कॅश बाळगणे कमी केले आहे. याचा परिणाम आता (atm)एटीएम होत आहे. कारण एटीएमची संख्या आता कमी होत आहेत. (bank) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीतून देशातील एटीएमच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर २०२३ मध्ये देशातील (atm) एटीएमची संख्या २,१९,००० इतकी होती. वर्षभरात सप्टेंबर २०२४ ही संख्या घटून २,१५,००० वर आली आहे. या शिवाय शहरांमध्येही कमी ग्राहक असलेली एटीएम बंद करावी लागली आहेत किंवा त्यांच्या जागा बदलल्या आहेत. (upi) यूपीआय हाताळण सोप्प झाल्यामुळे एटीएमचा वापर कमी होत असल्या समजत आहे.
आकड्यांकडे पाहीले तर ऑफ साईट एटीएमच्या संख्येत गेल्या चार वर्षांत घट सुरु आहे.
सप्टेंबर २०२१ मध्ये ऑफ साईट एटीएम ९७,३८३ होते
सप्टेंबर २०२२ मध्ये ऑफ साईट एटीएम ९७,०७२ झाले सप्टेंबर २०२३ मध्ये ऑफ साईट एटीएम ९३,७५१ राहीले
सप्टेंबर २०२४ मध्ये ऑफ साईट एटीएम ८७,८३८ उरले
म्हणजे साल २०२१ तुलनेत साल २०२४ मध्ये ऑफ साईट एटीएमची संख्या सुमारे १० टक्के घटली.