Advertisement

तीस वर्षीय तरुणाच्या गळ्याला सत्तूर लावून लुटले

प्रजापत्र | Thursday, 07/11/2024
बातमी शेअर करा

बीड दि.०७ (प्रतिनिधी)- गळ्याला सत्तूर लावून धमकी देत एकास ऑनलाईन पैसे टाकण्यास भाग पाडल्याचा प्रकार वडवणी येथे (दि०६) बुधवार रोजी घडला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  सविस्तर माहिती अशी कि, गौतम गणेशचंद्र दास (वय ३०) यांना अनोळखी चार व्यक्तीने गळ्याला सत्तूर लावून त्यांचा मोबाईल हिसकावून घेऊन त्यातील गुगुल- पे चा पासवर्ड मारहाण करून जबदस्तीने विचारून घेऊन खात्यामधील ९ हजार ४०० रुपये मोबाईलमधून सोहेल हनखान पठाण याच्या खात्यावर ऑनलाईन ९ हजार ४०० रुपये टाकण्यास सांगितले. त्यानुसार दास यांनी सदरील पैसे ट्रान्सफर केले. या प्रकरणी दास यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार आरोपींविरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement