Advertisement

जयदत्त क्षीरसागरांनी काय घेतला निर्णय ?

प्रजापत्र | Monday, 04/11/2024
बातमी शेअर करा

 बीड : बीड विधानसभेच्या संदर्भाने मोठी बातमी हाती येत आहे. येथून उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. बीड विधानसभा निवडणुकीत क्षीरसागर कुटुंबातील तिघांनी अर्ज भरले होते. मात्र आता माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी काहीवेळापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज माघारी घेत असल्याचे कळविले आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या समीकरणांमध्ये मोठे बदल होतील. 

 

Advertisement

Advertisement