Advertisement

मराठा आरक्षणावर आजच होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी

प्रजापत्र | Wednesday, 20/01/2021
बातमी शेअर करा

 नवी दिल्ली, 20,जानेवारी :  संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाची सुनावणी आज बुधवारीच होणार आहे. 25 तारखेपासून पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार होती. पण, आजच घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावर स्थगिती उठवणार का हे पाहण्याचे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मागील महिन्यात अर्थात 20 डिसेंबर 2020 रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती.अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेश्‍वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट तसेच न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश असलेले घटनापीठापुढे ही सुनावणी झाली होती.
यावेळी मुकुल रोहतगी यांनी युक्तीवाद केला. 'शैक्षणिक आणि सामाजिक आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे. नोकरीमध्ये देखील आरक्षण देण्याची गरज असून वर्तमान परिस्थिती बघता मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज असल्याचं मुकुल रोहतगी यांनी सांगितले.
तर 'EWS ला 10 टक्के आरक्षण देण्यात आले पण हाच समसमान हा न्याय मराठा समाजाला का नाही. आताच्या लोकसंख्येनुसार विचार करण्याची आवश्यकता आहे', असा युक्तीवाद कपील सिब्बल यांनी केला होता.
सर्व युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्तींनी आपल्या निर्णयात नमूद केले की, मराठा आरक्षणाच्या  प्रकरणाची सुनावणी 25 जानेवारी 2021 पासून सुरू  होईल.' तसंच, घटनेत 102 व्या घटना दुरुस्तीचा प्रश्न असल्याने न्यायालयाने अ‍ॅटर्नी जनरल यांना नोटीस बजावली होती. न्यायालयाने वकिलांना लेखी युक्तीवाद सादर करण्यास सांगितले होते. परंतु, या घटनापीठापुढे आजपासूनच सुनावणी सुरू होणार आहे.

Advertisement

Advertisement