बीड दि. २४ : बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना उमेदवारी जाहीर केली आहे.तर केज मतदारसंघातून माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. बीड जिल्ह्यातील इतर जागांवरचा सस्पेन्स मात्र अजूनही कायम आहे.
बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार सहाही जागा लढविणार असल्याचे सांगितले जाते. मात्र पक्षाचे उमेदवार अजून निश्चित नाहीत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी ) ची पहिली ४४ उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. जयंत पाटील यांनी जाहीर केलेल्या या यादीत बीड जिल्ह्ज्यातील आष्टी आणि केज मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. केजमधून माजी आमदार पृथ्वीराज साठे तर आष्टी येथून मेहबूब शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मेहबूब शेख हे राष्ट्रवादीच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष असून एक अल्पसंख्यांक चेहरा आहे.