Advertisement

बार्शी नाक्यावर महिलेला टिप्परने उडवले

प्रजापत्र | Saturday, 19/10/2024
बातमी शेअर करा

बीड दि.१९(प्रतिनिधी)- शहरातील बार्शी नाका बायपास चौक येथे एक महिला मोटारसायकलवर मांजरसुंबाकडे जात असताना जगदंबा स्टोन क्रेशरचे टिप्पर (एम.एच.२३-एयू-४६७०) ने मोटारसायकल (एम.एच.२३-एएच-८४३५) ला जोराची धडक दिल्याची घटना दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये सदरील महिलेचा जागीच मृत्यु झाला अन्य एक जखमी झाला असून टिप्पर सोडून चालक फरार झाला.सदरील महिलेचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला असून जखमीवर रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Advertisement

Advertisement