बीड- शिक्षण आणि सांस्कृतिकचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या (ambajogai) अंबाजोगाई शहरातील एका कला क्रीडा केंद्रावर पोलिसांनी छाप्पा मारून तब्बल ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस (beed police) अधिक्षक अविनाश बारगळ यांनी या कारवाईसाठी सपोनि बाळराजे दराडे,पोलीस उपनिरीक्षक श्री. विघ्ने यांच्यासह काही कर्मचाऱ्यांची पथकासाठी नेमणूक केली होती. (ambajogai) अंबाजोगाईतील अंबासाखर कारखाना शेजारील उड्डाणपुलाजवळ राज कला क्रीडा केंद्र असून येथे तिरट नावाचा जुगार अड्डा सुरु झाला होता. याची माहिती पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांना मिळाल्यानंतर त्यांनी (gramin police) ग्रामीण पोलीस ठाण्यातील सपोनि बाळाराजे दराडे, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक श्री.विघ्ने यांच्यासह काही कर्मचाऱ्यांना सदर ठिकाणी छापा मारण्याचे आदेश दिले होते. (crime news)त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी काल रात्री छापा मारला असता २३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर नगदी रोक्कड ५ लाख ७६ हजार ६०० रुपयांसह स्कर्पिओ गाडी, काही दुचाक्या, इतर साहित्य असा ५० लाख ३१ हजार १७६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जुगार अड्डयावरील मागच्या अनेक दिवसातील ही मोठी कारवाई असून यामुळे अवैध धंद्यावल्याचे धाबे दणाणले आहेत.
प्रजापत्र | Saturday, 19/10/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा