परळी दि.18 (वार्ताहर) : संभाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचार्याने परळीतील उड्डाणपूलावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि.18) रात्री सव्वा आठच्या सुमरास घडली. या कर्मचार्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला हे रात्री उशीरापर्यंत समोर आले नव्हते.
सुनील घोळवे असे त्या पोलीस कर्मचार्याचे नाव आहे. परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती आहे. सोमवारी (दि.18) सायंकाळच्या सुमारास घोळवे यांनी शहरातील उड्डाणपुलावर दुचाकी उभी केली. त्यानंतर पुलावरुन खाली उडी मारली. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना परळीतील खाजगी रुग्णालयात उपचार करुनलातूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
बातमी शेअर करा