बीड दि.६ (प्रतिनिधी)- 'शासन आपल्या दारी' व 'महिला सक्षमीकरण अभियान' हे शासनाचे दोन्ही महत्वाकांक्षी उपक्रम जिल्ह्य़ात अत्यंत यशस्वीपणे राबविल्याबद्दल बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचा रविवारी (दि.६) छत्रपतीसंभाजीनगर येथे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
बीड जिल्हयात मागच्या काळात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. त्यासोबतच महिला सशक्तीकरण अभियान देखील जिल्हा प्रशासनाने व सर्व विभागांनी चांगल्या प्रकारे राबविले. यासाठी प्रशासनाचे प्रमुख म्हणून बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचा गौरव करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथे एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठक यांना सन्मानित केले. हा गौरव जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा असल्याची प्रतिक्रिया यावेळी अविनाश पाठक यांनी दिली.

प्रजापत्र | Sunday, 06/10/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा