माजलगाव दि.०३ (प्रतिनिधी)- तालुक्यातील पात्रुड येथील एका १४ वर्षीय मुलाचा पाणी आल्यानंतर नळाला मोटर लावत असतांना विजेचा शॉक बसून मृत्यु झाल्याची घटना (दि.३) गुरुवार रोजी सकाळी घडली आहे.
सविस्तर माहिती अशी कि,शेख गौस मुजीब हा १४ वर्षीय मुलगा नळाला पाणी आल्यानंतर मोटार लावत होता. यावेळी त्यालाविजेचा जबरदस्त शॉक बसल्याने तो बेशुध्द पडला होता त्याला तात्काळ माजलगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यास डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या घटनेने पात्रूड येथे हळहळ व्यक्त होत आहे.
बातमी शेअर करा