Advertisement

कंटेनर दुचाकीच्या अपघातात एक ठार 

प्रजापत्र | Sunday, 29/09/2024
बातमी शेअर करा

  परळी दि.२९ ( प्रतिनिधी )- परळी शहरातील रेल्वे उड्डाणपुला जवळ दुचाकी आणि कंटेनरच्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार (दि.२८) रोजी रात्री ८ च्या सुमारास घडली.

      सविस्तर माहिती अशी कि, परळी शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर शनिवार (दि.२८) रोजी सायंकाळी ८ च्या सुमारास दुचाकी आणि मालवाहू कंटेनर क्रमांक एम.एच २६ एच ६०३८ यांची समोरासमोर धडक बसल्याने दुचाकीस्वार कंटेनर खाली आल्याने जागीच ठार झाला तर सोबत असलेला एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. जखमीस रुग्णालयात दाखल करण्यात आले. महामार्गावरील खड्डा चुकवत असताना हा अपघात झाला आहे. दरम्यान या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत.  

Advertisement

Advertisement