Advertisement

माजलगावमध्ये 'दादा,भैय्या,मामा,भाऊवर' कारवाया

प्रजापत्र | Monday, 23/09/2024
बातमी शेअर करा

बीड दि.२३ (प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी माजलगाव शहरात वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईचे आदेश दिले होते.त्यानुसार सोमवारी सकाळपासून शहरातील 'दादा,भैय्या,मामा,भाऊ' फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांसोबत बुलेटच्या सायलेन्सरवर कारवाई करून तब्बल १ लाख २९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.वाहतूक शाखेने बीडपाठोपाठ माजलगावमध्ये केलेल्या कारवायांची चर्चा जिल्हाभर सुरु आहे. 
            अविनाश बारगळ यांनी बीडच्या पोलीस अधिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून नियम मोडणाऱ्या व अवैध धंद्यावाल्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून कारवायांचा वेग वाढविला होता.सोमवारी (दि.२३) सकाळपासून सुभाष सानप व वाहतूक शाखेच्या टीमने शहरातील मुख्य रस्ते व गल्लीबोळात उभे राहून फॅन्सी नंबरप्लेट काढून घेतल्या.यावेळी ५७ फॅन्सी नंबर प्लेट १८ बुलेटचे आवाज सायलेन्सर व चार कर्कश आवाज करणारे हॉर्न काढून घेतले.या कारवाईत वाहतूक पोलिसांनी तब्बल १ लाख २९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.या कारवाई सुभाष सानप,नारायण दराडे,श्री.उबाळे,नितीन काकडे,राम पवार,अजिनाथ बांगर,शेख यांचा समावेश होता.

 

Advertisement

Advertisement