बीड दि. २० (प्रतिनिधी ) : गेवराई मतदारसंघातून २ वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आ. लक्ष्मण पवार यांनी काही दिवसांपूर्वी (beed) बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत विधानसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा केली होती. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडालेली असतानाच आता त्यांनी भाजपच्या नेत्या आ. पंकजा मुंडे यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली आहे.(pankaja mundhe ) पंकजा मुंडे कधी जिल्ह्यात येतच नव्हत्या आणि त्यांनी आम्हाला वेळ दिला नाही असे म्हणत आ. लक्ष्मण पवार यांनी आता दोन्ही मुंडेंच्या विरोधी सूर लावला आहे, त्यामुळे आ. लक्ष्मण पवार यांच्या मनात नेमके आहे तरी काय ? त्यांना कोणती वाट चालायची आहे याची चर्चा सध्या मतदारसंघात आहे.
गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार हे दोन वेळा भाजपच्या तिकिटावर आमदार झालेले आहेत. पवार कुटुंबातील विधानसभेत गेलेली लक्ष्मण पवार ही तिसरी पिढी. पण पवार कुटुंब हे तसे ना जनसंघाचे , ना मूळ भाजपचे. (laxman pawar) लक्ष्मण पवार यांचे आजोबा शाहूराव पवार हे कम्युनिस्ट पक्षाकडून आमदार (१९६७ ) झालेले तर लक्ष्मण पवार यांचे वडील माधवराव हे शरद पवारांच्या काँग्रेसकडून (१९८० ) आमदार झालेले . पवार कुटुंबाचा तसा भाजपशी संबंध आला तोच मुळी लक्ष्मण पवार यांच्यापासूनच. २००९ च्या निवडणुकीत अमरसिंह पंडित यांचा भाजपच्या तिकिटावर अल्पमतानी पराभव झाला आणि त्या पराभवाला भाजपमधीलच काही लोक जबाबदार आहेत असे मानून त्या निवडणुकीनंतर अमरसिंहानी भाजप सोडला. म्हणून २०१४ च्या निवडणुकीत पंकजा मुंडेंनीच लक्ष्मण पवार यांना उमेदवारी दिली आणि निवडणून देखील आणले. २०१४ आणि २०१९ या दोन निवडणुका लक्ष्मण पवारांनी भाजपच्या कमळावर जिंकल्या. पण भाजपच्या संघटनेशी त्यांचे फारसे कधी जमले नव्हते. मतदारसंघात आ. पवारांची स्वतःची अशी 'लक्ष्मणसेना ' कायम कार्यरत राहिलेली आहे.
मागच्या काही वर्षात असेही आ. पवार भाजपमध्ये तसे पंकजा मुंडेंपासून दुरावले होतेच . ते फडणवीसांच्या अधिक जवळ जात असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपमधील मुंडे समर्थकांनी त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवले. आता तर त्यांनी अगोदर धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आणि लगेच आपण पंकजा मुंडेंना देखील अनेकदा आपल्या अडचणी सांगितल्या, भेटीची वेळ मागितली, पण त्यांनी आमचे ऐकून घेतले नाही, आम्हाला वेळ दिला नाही असे म्हटले आहे. म्हणजे एक पर्कजारे त्यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दलही जाहीर नाराजी व्यक्त केली आहेच.
आ. पवार यांनी भलेही आपण किंवा आपल्या कुटुंबातील कोणी विधानसभा निवडणूक लढविणार नाही असे म्हटले असेल , मात्र ते कोणालाच पटणारे नाही. आ. पवार मागच्या काही काळात प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रेषण आहेत, मात्र त्या काळात त्यांचे पुतणे शिवराज पवार यांनी मतदारसंघात संपर्क वाढविलेला आहेच. शिवराज पवार यांना पैठणहून 'खुले ' मार्गदर्शन होत असते अशी चर्चा आहे. त्यामुळे पवारांच्या कुटुंबातले कोणी निवडणूक लढविणार नाही हे तर शक्य नाही. मग (laxman pawar)आ. पवारांना भाजप आणि महायुतीमधून भर पडायचे आहे का ? आजच्या घडीला मराठा समाजाचा भाजपवर मोठा रोष आहे. त्यातही गेवराई मतदारसंघात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे भाजपोची उमेदवारी आपल्या अडचणी वाढवू शकते हे लक्षात घेऊनच तर आ. पवार हे सारे बोलत नाहीत ना आणि त्यांना तुतारीच हाती घ्यायची आहे का ? याच्या चर्चा मतदारसंघात सुरु आहेत.
प्रजापत्र | Saturday, 21/09/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा