Advertisement

जिल्हा बंदला बीडमध्ये संमिश्र प्रतिसाद

प्रजापत्र | Saturday, 21/09/2024
बातमी शेअर करा

बीड- (Beed District)- मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे (Maratha community should get reservation from OBC),यासाठी अंतरवाली सराटी (antarwali sarati)  येथे सहाव्यांदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.त्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात आज मराठा समाजाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती.बीडमध्ये या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असून चौकाचौकात पोलिसांचा फौजफाटाही तैनात असल्याचे चित्र आहे. 
           बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत आहे.मनोज जरांगे यांनी उपोषणाला बसताच बीडमधून हजारो समर्थक अंतरवली सराटीच्या दिशेने रवाना झाले आहेत.शनिवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आल्यानंतर बीडमध्ये याला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.बीडची मुख्य बाजारपेठ असलेल्या सुभाष रोडवरील सर्व दुकाने कडकडीत बंद असल्याचे दिसून आले.तर नगर रोड आणि जालना रोडवर या बंदला मात्र संमिश्र प्रतिसाद आहे.दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी जिल्हा पोलीस दलाला अलर्ट मोडवर ठेवले आहे.तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक,नगर नाका,साठे चौकसह संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा तगडा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.जे नागरिक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे कळते.काल पोलिसांच्या वतीने बीडमधील शेकडो लोकांना नोटीसही पाठविण्यात आल्या आहेत.  

 

धारूर-आडस रोडवर रास्तारोको 


मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ जिल्हा बंदची हाक दिली असताना धारूर-आडस रोड आंदोलनकर्त्यांनी अडविला होता.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे.रस्त्यावर झाडे टाकून वाहतूक बंद करण्यात आली होती.मात्र पोलिसांनी सध्या घटनास्थळी धाव घेतली आहे. 

 

Advertisement

Advertisement