Advertisement

धुळे-सोलापूर महार्गावर एकाला उडविले

प्रजापत्र | Wednesday, 18/09/2024
बातमी शेअर करा

बीड दि.१८ (प्रतिनिधी)-तालुक्यातील पाली येथे धुळे-सोलापूर महार्गावर आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कारने दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यु झाला आहे.

 

सविस्तर माहिती अशी कि, धुळे-सोलापुर राष्ट्रीय महार्गावर पालीजवळ भीषण अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाल्याची घटना आज (दि.१८) दुपारी १ च्या सुमारास घडली. बीडकडून मांजरसुब्याकडे जाणारी इनोव्हा क्र.एम.एच. २३ ई. ७८७८ या चार चाकी वाहनाने दुचाकी क्रमाक एम.एच.२३ बीई ७७१२ ला पाठीमागून जोराची धडक दिल्याने या धडकेत दुचाकी स्वरास गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला . मयताचे नाव सरवर चांद शेख (वय ५५) वर्षे रा. बालेपीर असे असून इनोव्हा कार बीड येथील डॉक्टराची असल्याचे समजते. या अपघातात एक ठार एक गंभीर जखमी झाला असून जखमींचे नाव नदीम बशिर शेख वय ४२ वर्षे असे आहे.  अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले व वाहतुक सुरळीत करण्यात आली.

Advertisement

Advertisement