Advertisement

पंचायत समितीसमोर राडा एकास मारहाण

प्रजापत्र | Thursday, 12/09/2024
बातमी शेअर करा

 बीड दि.१२ (प्रतिनिधी )- रोजगार हमी योजनेच्या पांदण रस्त्याची तक्रार का केली? असं म्हणत एकास शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना बीड पंचायत समिती कार्यालयासमोर घडली. या प्रकरणी चार जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी कि, भागवत माधवराव शिंदे (रा. निर्मळवाडी ता. बीड) यांनी निर्मळवाडी व कराडवाडी अंतर्गत सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या पांदण रस्त्याची तक्रार केली होती. सदरील हा तक्रारदार पंचायत समिती कार्यालयासमोर आला असता त्यास विकास माखले, किशोर माखले, भागवत माखले, ज्ञानेश्वर वाणी या चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी शिंदे यांच्या फिर्यादीवरून चौघा जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Advertisement

Advertisement