बीड: बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी अखेर नियुक्ती करण्यात आली आहे. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून रिक्त असलेल्या या पदावर भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी सतीशकुमार खडके यांना नियुक्ती देण्यात आली आहे. अविनाश पाठक यांची बीडचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यापासून जिल्हा परिषदेचे सीईओ पद रिक्त होते. सतीशकुमार खडके हे २०१४ च्या तुकडीचे भाप्रसे अधिकारी आहेत. ते मुळच्या महसूल सेवेतले असून उपजिल्हाधिकारी संवर्गात त्यांनी काम केले आहे. ते यापूर्वी नाशिक येथे होते, तर सध्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते.
बातमी शेअर करा