Advertisement

मांजरसुंब्याजवळ पोलीस कर्मचाऱ्याला उडविले 

प्रजापत्र | Monday, 26/08/2024
बातमी शेअर करा

बीड दि.२६ (प्रतिनिधी) - मुख्य महामार्ग असलेल्या मांजरसुंब्याजवळ एका पोलीस कर्मचाऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. महामार्ग पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना ही घटना घडली.
    गजानन पराड असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. आज सकाळी मांजरसुंब्याजवळ एका वाहनाला अडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यात ते जखमी झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी बीडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement