अशोक शिंदे
नेकनुर दि.२२(वार्ताहर)- नेकनूर येथील सर्जेराव सोनाजी गुळवे वय (६१ वर्ष) हे डी.एड कॉलेजच्या बाजूला, राज बियरबार जवळ शेतात शेळ्या घेवून गेले होते. पडीक शेतात शेळ्या चारत असतांना जवळच असलेल्या LMKV विद्युत तारेला चिटकून त्यांचा जाग्यावर मृत्यु झाला.
त्यांच्या शेळ्या संध्याकाळी घरी आल्या पण ते शेळ्यासोबत नसल्याने घरचे व नातेवाईक यांनी काल रात्री पासून शोध घेतला आज सकाळी ते मोरे व करपे यांच्या शेत बांधावर विद्युततार खाली मृत्युमुखी पडलेले अढळून आले. त्यांच्या कपाळावर विद्युततार चिटकल्याचे वण आहेत. महावितरण चे अधिकारी यांना अनेक वेळा येथील रहिवाशी विकास मोरे व या भागतील शेतकऱ्यांनी तक्रारी करून सुध्दा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी काहीच दखल न घेता दुर्लक्ष केल्याने तार लोंबकळत ठेवल्याने हा मृत्यु झाला आहे. असे परिसरातील शेतकरी व रहिवाशी सांगत आहेत. गुळवे यांचे नातेवाईक आणि गावकरी महावितरण अधिकाऱ्यावर मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी करत आहेत.