Advertisement

खरेदीला आले अन् ३६ हजाराचे दागिने लंपास केले

प्रजापत्र | Saturday, 17/08/2024
बातमी शेअर करा

 बीड दि.१७ (प्रतिनिधी)- नवगण राजुरी येथील सोन्या-चांदीच्या दुकानामध्ये दोघेजण ग्राहक म्हणून आले होते. या दोघांनी ३६ हजार रुपयांचे सोन्याचे हुजर चोरून नेले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    वसंत जानू नुमाने यांचे नवगण राजुरी येथे श्री गणेश ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानामध्ये दोघे जण दागिने खरेदी करण्यासाठी आले होते. दुकान मालकाचे लक्ष विचलीत करत दोघांनी ३६ हजार रुपयांचे सोन्याचे हुजर चोरून नेले. आपल्या दुकानातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे दुकानदाराच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement