बीड-शहरातील बार्शी रोडवरील शिवसेना कार्यालयाच्या बाजूला असणाऱ्या ऐक्सिस बँकेचे एटीएम फोडताना एका चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी रात्री २ च्या सुमारास अटक केली आहे.
अक्षय दिलीप गायकवाड (वय-२५ रा. पेंडगाव) असे त्या आरोपीचे नाव आहे.पहाटे २ च्या सुमारास अक्षय बार्शी रोडवर असणाऱ्या ऐक्सिस बँकेच्या एटीएममध्ये दगडाने मशीन फोडून कॅश काढण्याचा प्रयत्न करत होता. रात्री पेट्रोलिंग करणाऱ्या शिवाजीनगर पोलिसांना एटीएममध्ये संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून एटीएममधील पैसे मात्र सुरक्षित असल्याचे कळते.
बातमी शेअर करा