बीड-मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात गुटख्याची तस्करी वाढल्याच्या तक्रारी सुरु झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने दिंद्रुड हद्दीमध्ये आयशर टेम्पोतून लाखोंचा गुटखा जप्त केला आहे.पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई सुरु असल्याचे कळते.
स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी उस्मान शेख यांनी स्वीकारल्यानंतर गुटखा तस्करांवर त्यांनी मोठी कारवाई केली आहे.आजच्या कारवाईत पोलिसांनी जवळपास ५० लाखांपेक्षा अधिकचा माल ताब्यात घेतल्याचे कळते. सध्या दिंद्रुड पोलीस ठाण्यात हा आयशर टेम्पो लावण्यात आला आहे.दरम्यान पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.दरम्यान या कारवाईमुळे गुटख्याचे तस्कर आणि विक्रेत्यांमध्ये मात्र खळबळ उडाली आहे.
बातमी शेअर करा