देशात सलग बाराव्या दिवशी इंधन दरवाढ
बीड- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाऊन होता.मात्र आता अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी देश अनलॉक होण्यास सुरुवात झाल्यानंतर वाहने रस्त्यावर धावू लागली आणि मागील बारा दिवसांपासून इंधनाची दरवाढ सुरु झाली.बीडमध्ये गुरुवारी (दि.१८) पेट्रोल ८५.७५ तर डिझेल ७४.८८ रुपये प्रतिलिटर असा दर आहे. तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोलच्या किंमतीत ५१ पैसे आणि डिझेलमध्ये ६० पैशांची वाढ केली आहे.मागील चार दिवसापूर्वी बीडमध्ये ८३.८० रुपयांनी मिळणारे पेट्रोल आता ८५.७५ रुपयांनी मिळत आहे.म्हणेज १.९५ रुपयांची वाढ अवघ्या चार दिवसांत झाली असून डिझलेही चार दिवसात २.२३ रुपयांनी महागले आहे.दरम्यान मागील १२ दिवसांपासून होणारी इंधनाची दरवाढ सर्वसामान्यांच्या अडचणीत भर टाकणारी ठरत आहे.
बातमी शेअर करा