बीड दि. १ (प्रतिनिधी ) : बीड जिल्ह्याच्या पत्रकारितेतील जुन्या पिढीतील ज्येष्ठ पत्रकार , चंपावतीपत्र चे संपादक नामदेवराव क्षीरसागर यांचे सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले .ते ८३ वर्षांचे होते.
नामदेवराव क्षीरसागर यांनी बीडच्या पत्रकारितेला मोठे योगदान दिले. पत्रकारितेचा वापर सामाजिक चळवळींची करण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. बीडच्या विकासाच्या प्रश्नांसह रेल्वे आंदोलनात त्यांची सक्रिय भूमिका राहिली. पत्रकारितेसोबतच ते शिक्षण क्षेत्रात देखील कार्यरत होते . संस्कार प्रबोधिनीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पहिले.
सोमवारी सकाळी त्यांना अचानक ह्रदयविकाराचा झटका आला. त्यातच उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बीडच्या पत्रकारिता क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. क्षीरसागर कुटुंबाच्या दुःखात 'प्रजापत्र ' परिवार सहभागी आहे.