Advertisement

माजी आमदाराला ब्लॅकमेल करीत मागितली खंडणी कथित पत्रकाराविरुद्ध गुन्हा

प्रजापत्र | Saturday, 29/06/2024
बातमी शेअर करा

 बीड दि. २९ (प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांना नगर जिल्ह्यातील एका पोर्टल आणि युट्युब चॅनेलच्या कथित पत्रकाराने तुमची अश्लील ध्वनिफीत आमच्याकडे असल्याचे सांगत ब्लॅकमेलकरून एक कोटीची खंडणी मागितल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी भीमराव धोंडे यांच्या फिर्यादीवरून नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांना एका पोर्टल व युट्युब चॅनेलचा कथित पत्रकार ईस्माईल दर्यानी उर्फ भैय्या बॉक्सर मागच्या काही दिवसांपासून ब्लॅकमेल करीत होता. तुमच्या अश्लील संभाषणाची ऑडिओक्लिप आमच्याकडे असल्याचे सांगत सदरील कथित पत्रकाराने धोंडे यांना १कोटी २५ हजाराची खंडणी मागितली आणि त्यातील २५ हजार घेतले देखील असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अखेर ब्लॅकमेलिंगला कंटाळून भीमराव धोंडे यांनी अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी सदरील कथित पत्रकारांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनें सर्वत्र खळबळ माजली आहे.

Advertisement

Advertisement