बीड-सद्या राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलीस भरती प्रकिया सुरु असून बीडमध्ये १७० जागांसाठी भरती होत आहे.यासाठी ८४०० उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून बुधवारपासून प्रक्रिया सुरु झाली.आज (दि.२१) सकाळी भरतीसाठी आलेल्या एक उमेदवारावर पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले असता त्याने मैदानी चाचणीसाठी उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.सध्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात त्या उमेदवारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
बीडमध्ये पोलीस भरतीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून उमेदवारांची कसून तपासणी सुरु आहे.आज सकाळी मांडवजाळीचा सुनील बहिरवाळ (वय-२४) हा तरुण मैदानी चाचणीसाठी उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन घेऊन आला होता.पोलिसांनी त्याला मैदानात सोडताना त्याची तपासणी केली असता बॅगमध्येही उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन पोलिसांना आढळून आले आहे.याप्रकरामुळे खळबळ उडाली असून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलीस विलास मोरे पाटील यांनी दिली आहे.
प्रजापत्र | Friday, 21/06/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा