Advertisement

आणखी एका गुंडाची हर्सूलमध्ये रवानगी

प्रजापत्र | Monday, 03/06/2024
बातमी शेअर करा

बीड-शहरातील ग्रामीण आणि शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तीन ते चार गुन्हे दाखल असलेला सुयोग उर्फ छोटया प्रधानची अखेर आज (दि.३) ग्रामीण पोलिसांनी हर्सूलमध्ये रवानगी केली आहे. छोटया हा कुख्यात गुंड होता. लोकसभा निकालच्या पार्शभूमीवर ग्रामीण पोलिसांनी त्याला स्थानबद्धा केले आहे.

     बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार सुयोग उर्फ छोटया प्रधानवर ग्रामीण पोलीस ठाणे व शिवाजी नगर ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एमपीडीए कारवाईबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानंतर तो मागच्या काही दिवसापासून फरार झाला होता. अखेर त्याला अटक करून त्याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.ग्रामीण पोलिसांनी लोकसभा निकालाच्या अनुषंगाने ही कारवाई केल्याचे कळते.

Advertisement

Advertisement