बीड - बांधकामाची माती खोदण्याच्या कारणावरून दोन गट समोरासमोर आले, दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर लाठ्या काठ्याने हल्ला केला, यात दोन्ही गटातील अनेक जण जखमी झाले. ही घटना पाटोदा तालुक्यातील भाटेवाडी येथे घडली. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सविस्तर माहिती अशी कि, सुनील मंडलिक व कुंडलिक मंडलिक यांच्यामध्ये बांधकामाची माती खोदण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. या वादातून दोन गट समोरासमोर आले. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर लाठ्या-काठ्याने हल्ला चढवत मारहाण केली. यात दोन्ही गटातील लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणी कुंडलिक दादाराव मंडलिक यांच्या फिर्यादीवरून सुनील मंडलिक, स्वप्नील मंडलिक, गंगाराम मंडलिक, नंदाबाई मंडलिक, बारकाबाई मंडलिक यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले तर विलास मंडलिक यांच्या फिर्यादीवरूएन कुंडलिक मंडलिक, दादाराव मंडलिक, मनिषा मंडलिक, गंगुबाई मंडलिक या चौघांविरोधात पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.