Advertisement

मनोज जरांगेंची ८ जूनची सभा रद्द

प्रजापत्र | Thursday, 16/05/2024
बातमी शेअर करा

बीड-मराठा आरक्षणसाच्या प्रश्नावर नारायणगडमध्ये मनोज जरांगे यांची ८ जूनला भव्य सभा आयोजित करण्यात आली होती.मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार ही सभा रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.यामागचे कारण अद्याप समोर आलेले नसून ऑगस्टमध्ये ही सभा आयोजित करण्यात येऊ शकते अंदाज वर्तविण्यात येत आहे. 
                   मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला घाम फोडला होता.८ जून रोजी नारायणगडावर भव्य सभा होणार होती.याची राज्यभरात मोठी चर्चा ही सुरु होती.राज्यातून मराठा सभा या सभेसाठी दाखल होणार होता.मात्र आता ही सभा रद्द करण्यात आल्याचे कळते.यामागचे कारण अद्याप समोर आलेले नसून ऑगस्टमध्ये सभा आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.मात्र पावसाळ्यात पुन्हा ही सभा आयोजित करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे ही बोलले जात आहे.   

Advertisement

Advertisement